23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयगणेश चतुर्थीला मांस विक्रीवर बंदी, बंगळुरु मनपाचा निर्णय

गणेश चतुर्थीला मांस विक्रीवर बंदी, बंगळुरु मनपाचा निर्णय

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : गणेश चतुर्थीनिमित्त बंगळुरू महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. बंगळुरु महानगरपालिका हद्दीत मांस विक्री आणि प्राण्याच्या हत्येवर बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे कर्नाटकात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी घरोघरी गणरायाचं आगमन होतं. त्यामुळे या दिवशी मांस विक्री आणि प्राण्याच्या हत्येवर बंदी घालण्यात आली आहे.

सोमवारी कन्नड भाषेत या संबंधीचा आदेश बंगळुरु महानगरपालिकेने बजावला आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला पालिका हद्दीतील मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. दरम्यान, बंगळुरु महापालिकेच्या या निर्णयावर टकट खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. महापालिकेचा हा निर्णय घटनाबा असल्याचा दावा ओवेसींनी केला आहे. कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा आरोपही ओवेसी यांनी केला आहे.

कर्नाटकात ८० टक्के लोक मांसाहार करतात. सरकारने मांस विक्रीवर बंदी घालून गरिबांना शिक्षा दिली आहे. कर्नाटकातील सरकार धन दांडग्याचे आहे. भाजप जगाला काय संदेश देऊ इच्छिते असा सवाल देखील ओवेसी यांनी केला आहे.

असे प्रतिबंध यापूर्वी देखील लागू करण्यात आले होते. अनेक सणांच्या वेळी मांस विक्रीवर बंदी घातली जाते.यामध्ये कोणतीही नवीन बाब नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते एस.प्रकाश यांनी दिली आहे .

यापूर्वी १८ ऑगस्ट रोजी, बंगळुरु महापालिकेने कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवादरम्यान प्राण्यांची कत्तल आणि मांस विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी केला होता. तसंच बुद्ध पौर्णिमा आणि राम नवमीला देखील बंगळुरु महानगरपालिकेने मांस विक्रीवर बंदी घातली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या