27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयसिंगल यूज प्लास्टिकवर १ जुलैपासून बंदी

सिंगल यूज प्लास्टिकवर १ जुलैपासून बंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सरकारने सिंगल यूज प्लास्टिकविरोधात अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी कठोर नियम केले आहेत. यामुळे आता १ जुलैपासून कुणी सिंगल यूज प्लास्टिक विकताना अथवा वापरताना आढळल्यास, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सीपीसीबीने म्हटले आहे.

१ जुलैपासून पूर्णपणे बंद होणार सिंगल यूज प्लास्टिक –
सीपीसीबीने सिंगल यूज प्लास्टिकची लिस्ट देखील तयार केली आहे. जे १ जुलैपासून पूर्णपणे बंद होईल. या सर्व प्रॉडक्ट्सच्या पर्यायासाठी २०० कंपन्या प्रॉडक्ट्स तयार करत आहेत. यासाठी त्यांना लायसन्सचे नुतनीकरण करण्याची आवश््यकता नाही.

१ जुलैपासून या वस्तू होणार बंद –
– प्लास्टिक स्टिक ईयर बड्स
– फुग्यांची प्लास्टिक स्टिक
– प्लास्टिकचे फ्लॅग
– कँडी स्टिक
– आइसक्रीम स्टिक
– थर्माकोल
– प्लास्टिक प्लेट्स
– प्लास्टिक कप
– प्लास्टिक पॅकिंगचे सामान
– प्लास्टिकचे इन्व्हिटेशन कार्ड
– सिगारेट पॅकेट्स
– प्लास्टर आणि पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी)

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या