24 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeराष्ट्रीयमुलांवर स्टेरॉयडच्या वापरावर बंदी

मुलांवर स्टेरॉयडच्या वापरावर बंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीच्या दुस-या लाटेच्या संकटातून अद्यापही भारत सावरला नाही तोवर कोरोनाच्या तिस-या लाटेच्या शक्यतेने सरकारची चिंता वाढवली आहे. तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पूर्णपणे तयारी सुरू केली आहे. याच काळात केंद्र सरकारने कोरोना संक्रमित लहान मुलांच्या उपचारासाठी नवीन मार्गदशक सूचना जारी केल्या आहेत.

लहान मुलांच्या उपचारासाठी केंद्रीय आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणा-या आरोग्य सेवा महानिर्देशालयाने या सूचना जारी केल्यात. ऊॠऌर ने विना लक्षण आणि सौम्य संक्रमित असणा-या लहान मुलांवर स्टेरॉयडचा वापर करण्यावर बंदी आणली आहे. गाइडलायन्सप्रमाणे लहान मुलांवर याचा वापर हानिकारक होऊ शकतो. अशावेळी गंभीर स्थितीत त्याचा वापर केला जाऊ शकतो.

मुलांना रेमडेसिवीर दिले जाऊ शकत नाही
केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये संसर्गग्रस्त मुलांना अँटी-व्हायरल रेमडेसिवीर देऊ नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. डीजीएचएसने सांगितले की ३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये त्याच्या वापराच्या परिणामांबद्दल पुरेसा डेटा उपलब्ध नाही. म्हणून त्याचा वापर टाळावा.

स्टेरॉयडचा वापर टाळा
संसर्गाच्या लक्षणांनुसार आणि सौम्य प्रकरणांमध्ये स्टेरॉयड औषधांचा वापर हानिकारक आहे. म्हणूनच, मुलांसाठी स्टेरॉयडटा वापर टाळला पाहिजे. स्टेरॉयड योग्य वेळी वापरले जावे आणि योग्य डोस द्यावा आणि योग्य कालावधीसाठी द्यावा. स्वत:च स्टेरॉयडचा वापर टाळला पाहिजे.

मुलांची एचआरसीटी चाचणींना बंधणे
छातीवरील स्कॅनमुळे उपचारांमध्ये फारच मदत होत नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी कोरोना रूग्णांमध्ये केवळ काही निवडक प्रकरणांमध्ये एचआरसीटी घेण्याचे ठरवावे.

ताप आल्यास मुलांना कोणते औषध द्यावे?
सौम्य संसर्गाच्या बाबतीत ताप असल्यास पॅरासिटामोल दिला जाऊ शकतो. जर कफ असेल तर मोठया मुलांना सलाईनच्या गरम पाण्याने गुळण्या करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुलांची वॉक टेस्ट करण्याचा सल्ला
गाइडलायन्समध्ये मुलांसाठी ६ मिनिटांचा वॉक टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना पालकांच्या देखरेखीखाली ६ मिनिटांची वॉक टेस्ट देण्याचा सल्ला आहे. वॉक टेस्टमध्ये मुलाला त्याच्या बोटावर पल्स ऑक्सिमीटर ठेवून ६ मिनिटे सतत चालण्यास सांगितले जाते. यानंतर, त्याच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी आणि पल्स रेट मोजले पाहिजे.

५ वर्षाआतील मुलांनी मास्क घालू नका
५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालण्याची आवश्यकता नाही. ६ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांना मास्क घालू शकता तेदेखील केवळ पालकांच्या देखरेखीखाली असावे. तर १२ वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांनी प्रौढांसारखेच मास्क परिधान करावेत़

व्हाईट फंगस तयार करतोय ‘लंग बॉल’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या