21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयत्या अधिका-यास पाठविण्यास बॅनर्जींचा नकार

त्या अधिका-यास पाठविण्यास बॅनर्जींचा नकार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष जे़ पी़ नड्डा यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर केंद्राकडून स्थानिक आयपीएस अधिका-यांना पाचारण करण्यात आले होते. परंतु राज्यातील ममता बॅनर्जी सरकारने मात्र या अधिका-यांना पाठवण्यास नकार दिला आहे.

केंद्रातून पश्चिम बंगालमधल्या तीन आयपीएस अधिका-यांना तैनातीसाठी गृह मंत्रालयाकडून करण्यात आलेली मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने फेटाळून लावली आहे़ सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रात तैनातीसाठी अधिका-यांना मुक्त केले जाऊ शकत नाही, असे ममता सरकारने म्हटले आहे.

गृह मंत्रालयाकडून पश्चिम बंगालमधले तीन आयपीएस अधिकारी – भोलानाथ पांडेय (एसपी, डायमंड हार्बर), राजीव मिश्रा (एडीजी, साऊथ बंगाल) आणि प्रवीण कुमार त्रिपाठी (डीआयजी, प्रेसिडेन्सी रेंज) यांना केंद्रात तैनातीसाठी पाचारण केले होते. गेल्या आठवड्यात गुरुवारी कथितरित्या झालेल्या भाजप अध्यक्ष जे़ पी़ नड्डा यांच्या ताफ्यावर हल्लाच्यावेळी हे तीन अधिकारी संबंधित भागाचे इन्चार्ज होते.

घरात घुसून महिलेवर अत्याचार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या