25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeउद्योगजगतबँकिंग, आयकरचे नियम १ जूनपासून बदलणार

बँकिंग, आयकरचे नियम १ जूनपासून बदलणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : येत्या १ जूनपासून दैनंदिन व्यवहारांमधील विविध नियमांत बदल होणार आहे. यामध्ये बँकिंग, आयकर, गॅस सिलेंडर, चेक पेमेंटपासून ते गुगलपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. या बदलांचा दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होणार आहे. अर्थात, आयकर विभागात नेमका काय बदल होणार, याकडे अनेकांचे लक्ष असेल. पुढील महिन्यात एक नवी वेबसाईट लॉंच होणार असल्याने १ जूनपासून जुन्या वेबसाईटचा वापर करता येणार नाही. नव्या वेबसाईटमध्ये आयकर भरणा-यांसाठी ब-याच गोष्टी सुलभ होणार आहेत, असा दावा केला जात आहे.

आयकर रिटर्न फाईल करणा-यांसाठी आता एक स्वतंत्र सोय केली जाणार आहे. ७ जूनपासून आयकरची नवी वेबसाईट लॉंच होणार आहे. त्यामुळे १ ते ६ जूनदरम्यान करदात्यांना आयकर विभागाच्या जुन्या वेबसाईटचा वापर करता येणार नाही. या सहा दिवसांच्या काळात वेबसाईटमध्ये बदलांची प्रक्रिया सुरू राहील. नवी वेबसाईट आल्यावर आयटीआर दाखल करण्याची पद्धत आणि अनुभव पूर्णपणे बदलणार आहेत. नव्या साईटमध्ये अ‍ॅडव्हॉन्स फिचर्स असतील, त्यामुळे आयटीआर फाईल करणे सोपे होईल.

दरम्यान, केंद्र सरकारकडून दर तीन महिन्यांनी अल्पबचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यात येतो. याबाबत सरकार समीक्षा करते. गेल्यावेळी सरकारने व्याजदरात कपात केली होती. मात्र, विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. अशा परिस्थितीत यावेळी जर व्याजदरात कपात केली गेली, तर ईपीएफ, एनएससी, सुकन्या समृद्धी योजनेसह अन्य योजनांचा लाभ घेणा-या ग्राहकांना धक्का बसू शकतो. गॅस सिलेंडरबाबतही १ जून रोजी नवा बदल होणार आहे. तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल करतात. त्यामुळे १ जूनला याबाबत काय बदल होणार, याकडे गॅस सिलेंडर ग्राहकांचे लक्ष असणार आहे. सध्या एलपीजी सिलेंडरचा दर ८०९ रुपये आहे. पुढील महिन्यात दर वाढल्यास ग्राहकांवर अतिरिक्त बोजा पडू शकतो.

चेक पेमेंटमध्ये बदल
१ जूनपासून चेक पेमेंटच्या पद्धतीत बदल होणार आहे. हा बदल सध्या तरी बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी लागू आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशनचा नियम अनिवार्य केला आहे. त्या माध्यमातून चेकसंबंधीच्या गडबडीपासून वाचता येईल. जेव्हा ग्राहक कुणालाही चेक जारी करेल, तेव्हा बँक ग्राहक चेकची संपूर्ण माहिती घेईल. या क्रॉस चेकिंगदरम्यान जर काही गडबड झाली, तर त्या चेकला रिजेक्ट करण्यात येईल.

गुगल स्टोरेज पॉलिसीत होणार बदल
आता तुम्ही पूर्वीप्रमाणे गुगल फोटोमध्ये अनलिमिटेड फोटो अपलोड करू शकणार नाही. गुगल स्टोरेज पॉलिसीमध्ये १ जूनपासून मोठा बदल होणार आहे. यापूर्वी गुगल ड्राईव्हमध्ये २५ जीबी स्पेस दिला जात असे. मात्र आता गुगलने यात कपात केली आहे. आता एकूण १५ जीबी स्पेस दिला जाईल. त्यामध्ये ईमेल, गुगल ड्राईव्ह, गुगल फोटो या सर्वांचा समावेश असेल. मात्र, अधिक स्पेस वापरायचा असल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागतील.

नौकरीचे पैसे का मागितले म्हणून बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या