26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयविजय माल्ल्याचे शेअर्स विकून बँकांना ७९२ कोटी मिळाले

विजय माल्ल्याचे शेअर्स विकून बँकांना ७९२ कोटी मिळाले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय बँकांकडून जवळपास ९ हजार कोटींचे कर्ज घेऊन परदेशात परागंदा झालेला विजय माल्ल्याचे शेअर्स विकण्यात आले़ कर्ज देणा-या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वात इतर बँकांच्या खात्यात आणखी ७९२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आलेत. ही माहिती प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दिली. विजय माल्ल्याच्या नावावर असलेले काही शेअर्स विकून हे पैसे गोळा करण्यात आलेत.

फरार उद्योजक नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि माल्ल्या यांनी केलेल्या बँकेच्या फसवणुकीच्या प्रकरणातील ५८ टक्के हानी वसूल झाली आहे, असा दावा ईडीने केला आहे. विजय माल्ल्या प्रकरणात ईडीने एका निवेदनही प्रसिद्ध केले आहे. किंगफिशर एअरलाईन्सच्या शेअर्सची विक्री एसबीआयच्या नेतृत्त्वात असलेल्या गटाकडे केल्यामुळे ७९२.११ कोटी रुपये वसूल झालेत. हे शेअर्स अंमलबजावणी संचालनालयाने एसबीआयच्या नेतृत्वाखालील कर्जदार बँकांना दिले.

हे शेअर्स ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार जप्त केले होते. गेल्या महिन्यात याच प्रकरणात बँकांच्या समूहाला समभाग विक्रीतून ७,१८१ कोटी रुपये मिळाले होते. ब्रिटनला पळून गेलेल्या माल्ल्याच्या आताच्या किंगफिशर एअरलाइन्सशी संबंधित ९,००० कोटी रुपयांच्या बँक घोटाळयाची चौकशी ईडी आणि सीबीआय करीत आहेत.

अनिल देशमुख यांना धक्का

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या