18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयखबरदार दशहतवादाला खतपाणी घालू नका

खबरदार दशहतवादाला खतपाणी घालू नका

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशवाद पसरवण्याासाठी होऊ नये. दहशतवादाला खतपाणी घालणा-यांनी विचार करावा, कारण दहशतवादाचा फटका त्यांना देखील बसू शकतो संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता पाकिस्तानला इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या अधिवेशनात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौ-यावर आहेत.

भारताने जगातील गरजू देशांना लस देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही जगातील लस निर्मिती करणा-या कंपन्यांना आमंत्रित करत आहे. आमच्या देशात या आणि लस निर्मिती करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केले आहे.

भारतातील सशक्त लोकाशाहीमुळे एक चहा विकणारा चौथ्यांदा भाषण देत आहे. भारतातील विविधता ही भारताची ताकद आहे भारत विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. भारताची विविधता त्याच्या लोकशाहीचा पुरावा आहे. देशवासियांची सेवा करताना मी २० वर्षे पूर्ण केली आहेत. मी आधी मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान म्हणून लोकांची सेवा करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

संपूर्ण जग महामारीच्या कचाट्यात
पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग १०० वर्षातील सर्वात मोठ्या महामारीला सामोरे जात आहे. मी अशा सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो ज्यांनी अशा भयंकर साथीच्या आजारात आपले प्राण गमावले. अशा कुटुंबियांसोबत माझी संवेदना व्यक्त करतो.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या