34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeराष्ट्रीयसावधान! बारमाही नद्या होतायत मोसमी

सावधान! बारमाही नद्या होतायत मोसमी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगभरात आदिमानव अवस्थेतील माणूस स्थिरावला तो नद्यांच्या काठी! नद्यांच्या तीरांवरच मानवी संस्कृती विकसित झाली. हजारो शतकांपासून हे घडत आल्याने माणसाला त्याची काहीच किंमत राहिली नाही व त्याने त्याच्या वागण्याने पर्यावरण बदल व हवामान बदल अशा राक्षसांना जन्माला घातले. एवढचे नव्हे जंगले तोडून सिमेंटची जंगले बनविण्यावरच भर दिला. माणसाच्या या अत्याचारी वर्तनाचा यु-टर्न होऊन मानवावरच परिणाम होणार आहे. जागतिक संस्थांनी केलेल्या पाहणीनुसार जगभरात बारमाही दुथडी भरुन वाहणा-या एकुण नद्यांपैकी ३७ टक्के नद्या या काही वर्षांतच मोसमापुरत्याच वाहणार आहेत. त्यामुळे या नद्यांच्या खो-यात विकसित झालेल्या मानवी संस्कृतींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.

जगभरात सुमारे २४६ मोठ्या नद्या आहेत. त्या खुप लांबपर्यंत वाहून विशाल भुप्रदेशाची तहान भागवतात. मात्र पर्यावरण बदलामुळे गेल्या २० वर्षात या नद्यांच्या खो-यात होणा-या पावसाने विषम पद्धतीने जलवर्षाव केला आहे. गेल्या २० वर्षात १५ सेंटीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडणा-या दिवसांच्या संख्येत वाढ झाली मात्र १० सेंटीमीटरपेक्षा कमी पावसाच्या दिवसांत मात्र मोठी घट झाल्याचे आढळून आले आहे. नद्यांच्या बारमाही वाहण्यासाठी १०सेंटीमीटर पेक्षा कमी पावसाच्या दिवसांची नितांत गरज असते. मोठ्या पावसाने पाणी जमिनीत न मुरता वेगाने नद्यांमध्ये मिसळते. परिणामी नद्यांना महापूर येतो व सर्व पाणी समुद्रात परत जाते.रिमझिम पावसाचे १०० टक्के पाणी जमिनीत भरते. जमिनीची तृष्णार भागवल्यानंतर हे पाणी हळूहळू प्रतिदिन नदीत येत राहते. ही क्रिया दीर्घकाळ चालू रहात असल्याने नद्या बारमाही वाहत राहतात. मात्र अशा पावसाच्या दिवसांची घट ही पर्यावरण बदलाचा दुष्परिणाम आहे. दुसरीकडे मानवाने जन्माला घातलेल्या जंगलतोडीच्या भस्मासूरानेही ही समस्या उग्र करण्यास हसातभार लावला आहे.

भारतातील गंगा, सिंधू या नद्यांना याचा फटका बसायला लागला आहे. प्रयागराज, काशी अशा ठिकाणी उन्हाळयात नदीपात्रातील वाळू उघडी पडल्याचा प्रकार २०२० आढळुन आला. एवढेच नव्हे या परिसरातील बोअरला मिळणारे पाणी एकतर संपुर्णच बंद झाले किंवा फारच थोडे मिळायला लागले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानूसार असे कधीच झाले नव्हते. अतिरिक्त पाणी उपसा व भुजल पुनर्भरण होत नसल्याने सिंधू नदी समुद्राला मिळतच नसल्याचे आढळून आले असून ती मध्येच आटून जात आहे.केवळ भारतातच नव्हे तर जगभरातही इजिप्तमधील नाईल, उत्तर अमेरिकेतील कोलोरॅडो, मध्य आशियातील अमुदर्या व सिरदर्या आदी नद्याही समुद्राला मिळत नसल्याचे आढळून आले आहे. जगातील सर्वात मोठी अमेझॉन नदीचा प्रवाहही पुर्वीएवढा जोमदार व भयावह राहिलेला नाही.

मानव निर्मित समस्येचा फटका
जंगलतोडीच्या भस्मासूरानेही ही समस्या उग्र करण्यास हसातभार लावला आहे. मोठ्या नद्यांच्या खो-यात, काठांवरील भागात असलेले जंगलामुळे जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात होती. हिवाळा व उन्हाळयात हेच पाणी नदीत प्रवाहित होऊन त्याचा नदीच्या बारमाही वाहण्यासाठी लाभ होत होता. मात्र आता अगदी नद्यांच्या काठांवरील जंगलेही तोडल्यमुळे ही क्षमता प्रचंड प्रमाणात घटली आहे. त्यामुळेही पाणी वेगाने वाहून जाऊन नद्या उन्हाळयात कोरड्या पडायला लागल्या आहेत. फोरम फॉर पॉलिसी डायलॉग्स ऑन वाटर कांफ्लिक्ट्स इन इंडिया ही पुण्यातील संस्था तसेच वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड (डब्ल्यू डब्ल्यू एफ) या संस्थांनी हे निष्कर्ष त्यांच्या अभ्यासात मांडले आहेत.

असे आहे जलसंकट
– ३७ टक्के बारमाही नद्या संकटात
– गंगा,सिंधूसह अ‍ॅमेझॉन, नाईलवरही संकटाची छाया
– सिंधू समुद्राला मिळेना, गंगेतील वाळू उघड्यावर
– १० सेंटीमीटरपेक्षा कमी पावसांच्या दिवसात घटीमुळे फटका
-जागतिक पर्यावरण बदल व जागतिक वृक्षतोडीमुळे ही समस्या
– महापुरामुळे जमिनीची धूप झाल्याने जमिनीच्या सुपीकतेवरही संकट

विकासावरच येणार मर्यादा
जगात अद्यापही नद्यांवर बांधलेल्या धरणातून निर्माण होणा-या जलविद्यूत उर्जेचाच वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. शेकडो धरणे काठांवर असलेल्या या नद्या आटल्यास माणसाच्या विकासावरच मर्यादा येणार असून पुन्हा अश्मयुगीन माणसासारखे जगण्याची वेळ येणार आहे.

मुख्यमंत्री कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंज-यात अडकले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या