24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयअनलॉक करताना काळजी घ्या

अनलॉक करताना काळजी घ्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिवसेंदिवस देशभरात कोरोनाची गती कमी होत आहे, परंतु या दरम्यान, एम्सच्या प्रमुखांसह अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे की भारतातील कोरोनाची तिसरी लाट टाळता येणार नाही. दैनंदिन केसेसमध्ये घट होण्यास सुरु झाल्यानंतर बºयाच राज्यांनी कोरोना निर्बंध कमी करण्यास सुरवात केली आहे, परंतु निर्बंध कमी करणे संकटात ओढणारी ठरू नये, यासाठी केंद्राने आधीच या राज्यांना कोणती खबरदारी घ्यावी हे सांगितले आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या सचिवांना पत्र लिहून ३ टी + व्ही फॉर्म्युला अवलंबण्यास सांगितले आहे.

पत्रात सर्व राज्यांना सांगण्यात आले आहे की निर्बंधात शिथिलता देताना त्यांनी टेस्ट-ट्रॅक-उपचार आणि लसीकरण म्हणजेच ३ टी प्लस व्ही फॉर्म्युला लक्षात ठेवले पाहिजे. राज्यांना कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जसे की मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर राखणे आदी बाबींचा समावेश आहे. बºयाच ठिकाणी निर्बंध शिथिल होताच भाजीपाला बाजारात गर्दी दिसून येत आहे आणि कोरोना नियमांची दखल घेतली जात नाही.
स्थानिक पातळीवर पावले उचलावी

केंद्राने राज्यांना सांगितले आहे की कोरोना प्रकरणे कमी होत आहेत पण यामुळे तपास दर कमी होऊ नये. प्रत्येक क्षणी परिस्थिती बदलत असल्याने सक्रिय प्रकरणांमध्ये किंचित वाढ किंवा सकारात्मक दरामध्ये वाढ होण्यासारख्या सुरुवातीच्या संकेतांबद्दल सतर्क असले पाहिजे. छोट्या क्षेत्रात प्रकरणांमध्ये वाढ होत असेल तर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे पावले उचलून केवळ स्थानिक पातळीवरच मर्यादित ठेवले पाहिजे.

लसीकरण सर्वात मोठे शस्त्र
या व्यतिरिक्त लसीकरण हे सध्या कोरोनाविरूद्ध सर्वात मोठे शस्त्र आहे. संसर्गाची साखळी तोडण्यात हे सर्वात उपयुक्त आहे. म्हणूनच, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरण वाढविण्यास सांगण्यात आले आहे़ जेणेकरून जास्तीत जास्त लोकसंख्येचे जलद लसीकरण करता येईल.

मुंबईसह १० जिल्ह्यातील निर्बंध कायम, २४ जिल्ह्यांना दिलासा मिळणार, रायगड, रत्नागिरी व कोल्हापूर अजूनही चौथ्या वर्गात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या