22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीयनेहरूंमुळे जम्मू काश्मीर भारतात आहे

नेहरूंमुळे जम्मू काश्मीर भारतात आहे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी शनिवारच्या बैठकीत गांधी कुटुंबाप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत काही वादग्रस्त वक्तव्येही समोर आली आहेत. काश्मीरच्या पीडीपीमधून सीडब्ल्यूसी सदस्य बनलेल्या तारिक हमीद कर्रा यांनी फक्त गांधी कुटुंबच भारताला एकसंध ठेवू शकते. त्यामुळे राहुल गांधींनी पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेकडे परत यावे असे म्हटले आहे. कर्रा यांनी जम्मू -काश्मीरची जनता भारतात फक्त नेहरूंमुळेच आहे असेही म्हटले आहे.

नेहरूंची स्तुती करताना तारिक हमीद कर्रा यांनी सरदार पटेल यांना लक्ष्य केले आहे. जम्मू -काश्मीरचे लोक भारतात फक्त नेहरूंमुळेच आहेत. जम्मू -काश्मीर पाकिस्तानला सोपवण्यात पटेल जिनांच्या पाठीशी उभे राहिले, असे तारिक हमीद कर्रा यांनी म्हटले आहे. मात्र ताबडतोब, सीडब्ल्यूसीच्या काही सदस्यांनी हस्तक्षेप करून बैठकीत अजेंड्याबद्दल बोलण्यास सांगितले आणि त्यांना आठवण करून दिली की पटेल हे भारताचे एकत्रीकरण करण्यासाठी योगदान दिलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. पक्ष बळकट करण्यासाठी गांधी कुटुंबाच्या कामांचे कौतुक करणे आणि त्यांच्या नेतृत्वावर कोणत्याही टीकेविरोधात चिंता मोहन यांनीही भाष्य केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या