28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home राष्ट्रीय कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडे असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बºयाचदा या मधमाशा एकत्र झुंडीनें सगळीकडे हल्ले देखील करतात. घर किंवा झाड नाही तर आता चक्क मधमाशांनी विमानावर हल्ला केला आहे. या घटनेचे अंगावर काटा आणणारे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

विस्तारा एअरलाइनच्या दोन विमानांवर हजारो मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे तासभर वाहनाला विमानतळावरच थांबून राहावे लागले. एक विमानाच्या खिडकीला तर दुसºया विमानावर या मधमाशांनी कब्जा केल्याचे या व्हिडीओ आणि फोटोमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती.

एअरलाइनसोबत संपर्कात असलेल्या एक अधिकाºयाने रविवारी संध्याकाळी आणि सोमवारी संध्याकाळी मधमाशांनी विमानावर हल्ला केल्याच्या दोन घटना समोर आल्याचे सांगितले़ या घटनेमुळे नागरिक आणि कर्मचारी आश्चर्यचकित झाले तर दुसरीकडे प्रवाशांच्या अंगावर काटा देखील आला. त्यांना हटवण्यासाठी कर्मचाºयांना बरेच कष्ट देखील घ्यावे लागले. मधमाश्यांमुळे विमानाने सुमारे एक तास उशीर उड्डाण घेतल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या