लखनौ : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा सुप्रीमो मायावती सहभागी होणार नाही आहेत. या दोन्ही नेत्यांना राहुल गांधींनी यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा ३ जानेवारीला यूपीमध्ये दाखल होणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते कृष्णकांत पांडे यांनी सांगितले की यूपीतील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना या यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून निमंत्रण दिले जात आहे. अखिलेश यादव आणि मायावती यांच्याशिवाय ज्या नेत्यांना यात्रेत सामील होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.