23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयबंगालचे विभाजन होऊ देणार नाही

बंगालचे विभाजन होऊ देणार नाही

एकमत ऑनलाईन

कोलकाता : मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मी माझा जीव देईन पण भाजपला बंगालचे विभाजन होऊ देणार नाही, असे म्हटले आहे. तुम्ही मला धमकावू शकता, माझ्या छातीवर बंदूक ठेवू शकता आणि तरीही मी अखंड बंगालसाठी लढत राहीन असे ममता यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी पश्चिम बंगालपासून वेगळ्या राज्याची मागणी केली आहे.

यावर ममता बॅनर्जी यांनी वरील तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात अलिप्ततावाद वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप करून ममता बॅनर्जी म्हणाल्या की उत्तर बंगालमधील सर्व समुदायांचे लोक अनेक दशकांपासून एकत्र राहत आहेत परंतु भाजप लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप कधी गोरखालँडची मागणी करत आहे, तर कधी वेगळ्या उत्तर बंगालची मागणी करत आहे. गरज पडल्यास मी माझे रक्त सांडायला तयार आहे पण राज्याचे विभाजन कधीच होऊ देणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या