37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयदीदींकडून बंगालचा विश्वासघात; पंतप्रधान मोदींची टीका

दीदींकडून बंगालचा विश्वासघात; पंतप्रधान मोदींची टीका

एकमत ऑनलाईन

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खरोखर सुरुवात झाली आहे. रविवारी पंतप्रधान व भाजपचे सर्वाेच्च स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा नारळ फोडला. कोलकात्यामध्ये घेतलेल्या पहिल्याच प्रचारसभेत त्यांनी ममता बॅनर्जी व तृणमुल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. मा, माटी व मानूष अशी घोषणा देत सत्तेवर आलेल्या ममतादीदींना बंगालने सत्ता देताना त्या बंगालमध्ये परिवर्तन आणतील, अशी स्वप्ने पाहिली होती. मात्र ममतादीदींनी व तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंगालच्या जनतेचा मोठा विश्वासघात केला,असे टीकास्त्रच मोदींनी सोडले.

बंगालमध्ये जन्म घेतलेल्या महान व्यक्तींनी एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना बळकट केली. बंगालच्या याच भूमीने एक संविधान, एक निशान, एक पंतप्रधान यासाठी बलिदान देणारा पूत्र दिला. अशा पवित्र भूमीला मी नमन करतो. या भूमीने संस्काराची ऊर्जा दिली. या भूमीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राण फुंकले. बंगालच्या या भूमीने ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मान उंचावली. त्याच बंगालला ममता बॅनर्जी यांनी धोका दिला. तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंगालला अपमानित केले. मुलींवर अत्याचार केले,अशी टीका मोदींनी केली.

संपुर्ण विकासाचे दिले वचन
ब्रिगेड मैदानावरून तुम्हाला आशोल पोरिबोरतोची ग्वाही देण्यासाठी आलो आहे. बंगालमध्ये विकास आणण्याचे वचन मी देतो. बंगालच्या संस्कृती रक्षणाची, तरुण, शेतकरी, महिला व मुलींच्या विकासासाठी आम्ही २४ तास काम करू. कष्ट करण्यात कोणताही कुचराई करणार नाही,असे आश्वासनही मोदींनी दिले.

सोनार भारताचे काय करता? ममता बॅनर्जींचा मोदींवर प्रतिहल्ला
कोलकात्यात पंतप्रधान मोदींनी सोडलेल्या टीकास्त्रावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिहल्ला चढविला आहे. तुम्ही सोनार बांगलाची स्वप्ने दाखवता पण सोनार भारताचे काय? असा सवालच त्यांनी मोदींना विचारला आहे. मोदींनी कोलकातामध्ये सभा घेतली, तेव्हा ममता बॅनर्जी दार्जिल्ािंग मोरे येथील पक्षाच्यावतीने आयोजित पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्तेही एलपीजी सिल्ािंडरच्या पुठ्ठ्याच्या प्रतिकृती हातात घेत सहभागी झाले होते. मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि पक्षाचे खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँही उपस्थित होते.

ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींच्या सोनार बांगला या आश्वासनावर टीका करताना त्यांना खोटारडे असे संबोधन केले. बंगालमध्ये इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असताना आणि बँका विकल्या जात असताना पंतप्रधान बंगालमध्ये स्वप्ने विकायला आले आहेत, सोनार बांगलाआधी सोनार भारताचे काय झाले? अच्छे दिन कधी आणणार असा सवालच त्यांनी विचारला.

मोदींचे छायाचित्र असलेले कोविड लसीकरणाच्या प्रमाणपत्रांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. कोविड दरम्यान ते येऊ शकले नाहीत. मी रस्त्यावर होते. मात्र आज लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर त्यांचा चेहरा लावण्यात पुढाकार घेतला आहे. मात्र लसीच्या निर्मितीमागे भारताच्या वैज्ञानिकांचे परिश्रम आहेत,उगाच श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नका, असा टोलाही त्यांनी मोदींना हाणला.

गोव्यात शिवसेना २०-२५ जागांवर लढणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या