30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारताबरोबरचे संबंध अधिक चांगले करणार; पुतिन यांचा नववर्षाचा संकल्प

भारताबरोबरचे संबंध अधिक चांगले करणार; पुतिन यांचा नववर्षाचा संकल्प

एकमत ऑनलाईन

मॉस्को: भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होत असताना जुना मित्र रशिया दुखावला गेल्याची चर्चा सुरू होती. नव्या वर्षात भारत आणि रशिया यांचे कसे असतील यावर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भाष्य केले आहे. नव्या वर्षात रशिया-भारताचे संबंध अधिक चांगले होण्याच्या दृष्टीने काम सुरू राहणार असल्याचे पुतीन यांनी म्हटले.

राष्ट्रपती पुतीन यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाताळ आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पुतीन यांनी म्हटले की, रशिया आणि भारत हे दोन्ही देश विशेष रणनीतिक भागिदारीच्या संबंधातून जोडले गेले आहेत. कोरोना महासाथीचा आजार आणि इतर समस्या उभ्या ठाकल्या असतानाही दोन्ही देश विश्वासाने प्रगती करत आहेत. क्रेमलिनने पुतिन यांच्या वक्तव्याबाबत निवेदन जारी केले आहे.निवेदनानुसार, राष्ट्रपती पुतीन यांनी दोन्ही देशांमधील व्यापक राजकीय संवाद सुरू असून विविध क्षेत्रातील संयुक्त प्रकल्पांच्या बाजूने असल्याने सांगितले.

भारत आणि रशिया या दोन्ही देशांमधील मैत्री अनेक दशके जुनी आहे. भारत-रशियाच्या मैत्रीत कटुत्व कधीही आले नाही. त्याशिवाय, मागील काही वर्षांमध्ये रशिया-भारताचे रणनीतिक संबंध स्थिर आहेत. दोन्ही देशांमध्ये नेतृत्व बदल झाले तरी मैत्री संबंधावर कोणताही परिणाम झाला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. भारत आणि रशियात होणारी शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. अमेरिकेसोबत वाढत्या मैत्री संबंधामुळे रशिया दुखावला असल्याची चर्चा होती. मात्र, यंदाची परिषद ही करोना महासाथीच्या आजारामुळे टाळली गेली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मागण्या मान्य होईपर्यंत नववर्षाचे स्वागत नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या