नवी दिल्ली: चालबाज चिनी ड्रॅगनच्या चलाखीपासून सावध राहा, अशी सूचना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिका-यांना केली. एलएसीवर चीनच्या कुरापती आणि सैन्य स्तरावरील चर्चेदरम्यान चीनच्या मनसुब्यांपासून सतर्क राहा, असे राजनाथ यांनी लष्कराच्या अधिका-यांना सांगितले आहे. लष्कराच्या वरिष्ठ कमांडर्ससोबत संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली. सीमेवरील तणावाची स्थिती योग्यरित्या हाताळल्याबद्दलही संरक्षणमंत्र्यांनी लष्कराचे कौतुक केले.
गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्व लद्दाखमधील एलएसीवर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही बाजूंनी सुमारे ५० -५० हजार सैनिकांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे व इतर साधने तैनात केली आहेत. दोन्ही बाजूंनी आतापर्यंत लष्करी पातळीवरील चर्चेच्या अनेक फेºया झाल्या आहेत. पण अजून कुठलाही तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
युद्ध तयारीचा आढावा
सोमवारपासून सुरू झालेल्या चार दिवसांच्या लष्कराच्या वरिष्ठ कमांडरच्या परिषदेत चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषा तसेच जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबाबत भारताच्या युद्धाच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे.
सध्याच्या सुरक्षा वातावरणात भारतीय सैन्याने उचललेल्या पावलांचा आपल्याला अत्यंत अभिमान आहे.लष्कराला शस्त्रास्त्रांनी अधिक बळकट करण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही,’ असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.
तीन वर्षांच्या चिमुकलीच्या सुटकेसाठी रेल्वे धावली २४० किमी