30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयमहागाई सहनशिलतेच्या पलिकडे - राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

महागाई सहनशिलतेच्या पलिकडे – राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आपल्या देशातल्या जनतेवर आता महागाईची कु-हाड कोसळली आहे. महागाई ही सहन करण्याच्या पलिकडे गेली आहे. शेतक-यांसाठी काळे कायदे आणले गेले आहेत़ त्यामुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे़ या कायद्यांमुळे शेतक-यांवर लाचार होण्याची वेळ आली आहे. एवढे सगळे देशात घडत असतानाही फक्त निवडक मित्रांचा फायदा करुन देत मोदी सरकार गप्प बसले आहे़ या आशयाचे ट्विट करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

चार दिवसांपूर्वीच भारत जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत ९४ व्या स्थानी पोहचला आहे. यासंबंधीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला त्यावरुनही राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली होती. या सरकारने आपल्या खास मित्रांचे खिसे भरण्याचे काम केले आहे, असे राहुल गांधींनी म्हटले होते़ आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर महागाई आणि कृषी कायद्यांवरुन टीका केली आहे. देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे. भारतातील गरीब भुकेला आहे, अशात मोदी सरकारने फक्त आपल्या काही मित्रांचे भले केले आहे, असेही राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा म्हटले आहे.

कृषी कायद्यांना तर काँग्रेसने कडाडून विरोध दर्शवलेलाच आहे. त्यासाठी आंदोलनंही झाली होती. तसंच काँग्रेसशासित राज्यांमध्ये हे कायदे लागू करु नयेत अशीही भूमिका काँग्रेसने जाहीर केली. या कायद्यांमुळे शेतक-याचं कंबरडं मोडणार आहे. देशातला शेतकरी आधीच अनेक संकटांना सामोरा जात असतो अशात केंद्र सरकारने हे काळे कायदे आणून शेतक-यांवर अन्याय केल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. आज राहुल गांधी यांनी कृषी कायदे आणि वाढती महागाई यांचा संदर्भ घेऊन पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.

मोदींनी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले
देशातील वाढत्या बेरोजगारीवरुन काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने लावला आहे़ सप्टेंबर २०२० ची बेरोजगारीची आकडेवारी समोर आल्यानंतर मोदीजी आपण हे काय केलेत? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

असा आहे आत्ताचा बेरोजगारी अहवाल
पहिल्या स्तभांखाली २०११-१२ची बेरोजगारीचा दर देण्यात आला आहे जो २.२ टक्के होता. तर दुस-या स्तंभाखाली सप्टेंबर २०२० चा बेरोजगारीचा दर दाखवला आहे जो ६.६७ टक्के इतका आहे. तसेच मध्यभागी मोदी आत्ताच्या ताज्या बेरोजगारीच्या स्तंभाकडे पाहत आहेत आणि खाली ४५ वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी असा उल्लेख करण्यात आला आहे.

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे जीडीपी घसरला
नोटाबंदी आणि जीएसटी लागू झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असतानाच देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. त्यानंतर मार्च २०२० पासून अद्यापपर्यंत अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. पाच महिन्यांच्या लॉकडाउनमुळे जीडीपीचा दर मायनसमध्ये पोहोचला. जो आपला शेजारील देश बांगलादेशच्या जीडीपीपेक्षाही खाली गेला.

ना रहेगा गरीब, ना रहेगी गरिबी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या