23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयभूपेंद्र सिंह यूपी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

भूपेंद्र सिंह यूपी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

एकमत ऑनलाईन

लखनौ : भारतीय जनता पार्टीने अनेक राज्यात आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

दरम्यान या वर्षाच्या सुरूवातीला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. येत्या लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये पार पडणार असून त्यासाठी भाजपने देशभर मोर्चेबांधणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रासहीत अनेक राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

उत्तर प्रदेशमध्ये जाटांची संख्या जास्त असून तेथील मतदार भाजपवर नाराज असल्याची चिन्हे आहेत. देशभरात चाललेल्या शेतकरी आंदोलनात जाटांचा सक्रिय सहभाग होता. या जाटांचे मत आपल्याकडे वलवण्यासाठी जाट नेते भूपेंद्र सिंह यांना थेट प्रदेशाध्यक्षपद देत भाजपने चाल खेळली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमधील राजकीय समीकरणे बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या