24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयदेशात मोठा सायबर हल्ला

देशात मोठा सायबर हल्ला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : निलंबित भाजपा नेत्या नुपूर शर्माच्या मोहम्मद पैगंबर यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे मोठा वाद उफाळून आला आहे. अनेक अरब देशांनीही या प्रकरणी आपला विरोध दर्शवला आहे. भारतातही अनेक राज्यांमध्ये याच्या निषेधार्थ निदर्शनं झाली आहे. दरम्यान भारतात या प्रकरणामध्ये भारतातल्या अनेक वेबसाईट्सवर आंतरराष्ट्रीय सायबर अटॅक झाले आहेत.

या हॅकर्सनी भारतातल्या एका प्रमुख बँकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्नही केला होता. मलेशियातल्या हॅक्टिविस्ट समूह ड्रॅगनफोर्सने केलेल्या या सायबर हल्ल्यांमध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म्ससोबत इस्रायलमधला भारतीय दूतावास, राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंधन संस्थान आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या ई-पोर्टलला लक्ष्य केलं आहे. हॅकर्सनी साधारण ७० च्या आसपास वेबसाईट्स हॅक केल्या आहेत.

याशिवाय दिल्ली पब्लिक स्कूल, भवन आणि देशातल्या अनेक मोठ्या समूहांच्या प्रमुख शिक्षण संस्थांवरही हल्ला केला. फक्त महाराष्ट्रातल्या ५० पेक्षा अधिक वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत. ऑडिओ क्लिप आणि टेक्स्टच्या माध्यमातून हॅकर्सने एक मेसेज पाठवला आहे. ज्यात त्यांनी सांगितले आहे की तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारत सरकारच्या साईट्ससह काही खासगी पोर्ट्ल्स ८ ते १२ जूनच्या दरम्यान पूर्ववत करण्यात आली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या