23.2 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeराष्ट्रीयसरकारच्या या निर्णयाचा 40 लाखाहून अधिक कामगारांना फायदा होणार

सरकारच्या या निर्णयाचा 40 लाखाहून अधिक कामगारांना फायदा होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणू संसर्गामुळे बेरोजगारांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत मदत वाढ करण्याच्या निर्णयाला सरकारने अधिसूचित केले आहे. अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने कालावधी 30 जून 2021 पर्यंत वाढविला आहे. याद्वारे कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन (ईएसआयसी) मध्ये नोंदणीकृत कामगारांना 50% बेरोजगारीचा लाभ मिळेल. सरकारच्या या निर्णयाचा 40 लाखाहून अधिक कामगारांना फायदा होणार आहे.

अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत रोजगार गमावलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता आहे, ज्याचा फायदा ईएसआय योजनेत समाविष्ट असलेल्या कर्मचार्‍यांनाच होतो. म्हणजेच ईएसआयचे योगदान त्यांच्या मासिक पगारामधून वजा केले जाते.

नियमानुसार कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना तीन महिन्यांसाठी पन्नास टक्के पगार रोजगार लाभ म्हणून देण्यात येईल. या वर्षाच्या 24 मार्च ते 31 डिसेंबर दरम्यान ज्यांनी नोकर्‍या गमावल्या आहेत त्यांना हा लाभ देण्यात येईल. पूर्वी ही योजना 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली होती, परंतु आता त्याचा फायदा जून 2021 पर्यंत घेता येईल. अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेची वास्तविक पात्रता अटी विमाधारकांना 23 मार्च 2020 रोजी किंवा त्यापूर्वी आणि 1 जानेवारी 2021 रोजी किंवा त्यानंतर लागू असतील. जरी एखाद्या व्यक्तीने ईएसआयसीचा विमा उतरवला असेल, परंतु काही गैरव्यवहारामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले असेल, व्यक्तीविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल असेल किंवा सेवानिवृत्तीच्या तारखेआधी त्या व्यक्तीने सेवानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

विमाधारकाने नोकरी सोडण्यापूर्वी किमान 2 वर्षे काम केले असावे आणि योगदान कालावधीत कमीतकमी 78 दिवस योगदान दिले असावे. पीडित व्यक्तीला नोकरी जाण्याच्या 30 दिवसांच्या आत दावा करावा लागतो. यासाठी क्लेम फॉर्म थेट ईएसआयसी शाखा कार्यालयात ऑनलाईन सादर करता येईल. त्याद्वारे आपण ईएसआयसीच्या संकेतस्थळाला भेट देऊन अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेचा फॉर्म डाउनलोड करू शकता. फॉर्म मिळवल्यानंतर 15 दिवसांच्या आत क्लेमची रक्कम विमाधारकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल. व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आधारचा वापर केला जाईल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या