नवी दिल्ली : कोरोना संकट नियंत्रणात येत नसले, तरी देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. जून २०२० नंतर प्रथमच कोरोना रुग्णांच्या आकड्यात इतक्या मोठ्या फरकाने घट होण्याची ही पहिलीच वेळ असून, ही बाब दिलासादायक आहे, असे सांगितले जात आहे. गेल्या २४ तासांत १२ हजार ५८४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात १ लाख ५१ हजार ३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २४ तासात १२ हजार ५८४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. परिणामी देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ०४ लाख ७९ हजार १७९ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १८ हजार ३८५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ कोटी ०१ लाख ११ हजार २९४ इतकी झाली आहे. गेल्या १८ दिवसांत रोज देशभरात ३०० हून कमी रुग्ण दगावले आहेत. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.४३ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर १.४४ टक्क्यांवर आहे.
आरोग्य क्षेत्रासाठी स्वतंत्र निधी; केंद्र सरकारकडून लवकरच घोषणा