21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयदेशात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट !

देशात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट !

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह देशातील जवळपास सर्वच राज्यांतील कोरोनाची लाट ओसरू लागली असून, रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. दैनंदिन रुग्णसंख्याही ८० हजारांपर्यंत खाली आली आहे. त्यापेक्षा अधिक रुग्ण रोज कोरोनामुक्त होत आहेत. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येत मोठी घट होत असून, आता ही संख्या १० लाखांपर्यंत खाली आली आहे. कोरोनामुक्त रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता हा आकडाही वेगाने खाली येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे देशवासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, यापुढेही कोरोनाशी संबंधित नियमावलीचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, तसे झाल्यास कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येऊ शकते अन्यथा पुन्हा लाट उसळू शकते.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येत रोज मोठ्या संख्येने घट होताना दिसत आहे. देशात २४ तासांत ५४ हजार ५३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. विशेष म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश सोडून अन्य राज्यांत दैनंदिन रुग्णसंख्या ५ हजारांच्या खाली आली आहे. यामध्येदेखील बहुतांशी राज्यांतील दैनंदिन रुग्णसंख्या २ हजारांपर्यंत खाली आली आहे. तसेच प्रतिदिन होणारी मृत्यूसंख्यादेखील कमी झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात अगोदरच्या मृत्यूचे आकडे जोडले जात असल्याने मृत्यूचा दैनंदिन आकडा ३ हजारांवर जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या ७१ दिवसांत प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्या ८० हजारांपर्यंत खाली आली आहे.

दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने आता हळूहळू नियम शिथिल केले जात आहेत. अनेक राज्यांत अनलॉक करण्यात आले आहे, तर काही राज्यांत टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहे. मात्र, सूट मिळताच नागरिक बाजारात आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. तसेच नियमावलींचेही उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे ब-याच ठिकाणी पुन्हा प्रशासन संभ्रमात आहे. मात्र, अशा परिस्थितीत कोरोनावर मात करायची असेल, तर कोरोनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे, अन्यथा येणा-या काळात पुन्हा संकट उद्भवू शकते.

३१ दिवसांपासून कोरोनामुक्त अधिक
देशात एक वेळ अशी होती, कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती आणि कोरोनामुक्तचे प्रमाण कमी होते. मात्र, गेल्या ३१ दिवसांपासून नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनावर मात करणा-या रुग्णांची दैनंदिन संख्या अधिक आहे. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण झपाट्याने कमी होताना दिसत आहेत. दैनंदिन आणि साप्ताहिक संसर्ग दरही सतत कमी म्हणजे ५ टक्क्यांच्या खाली आला आहे. विशेष म्हणजे कोरोनावर मात करणा-या रुग्णांचे प्रमाणही ९५ टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे.

देशात नवे रुग्ण ८० हजारांच्या जवळ
देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. रोज आढळणा-या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणा-यांची संख्या सातत्याने अधिक आढळून येत आहे. मागील २४ तासात देशभरात १ लाख ३२ हजार ०६२ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून, ८० हजार ८३४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर ३ हजार ३०३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २,९४,३९,९८९ झाली असून, आजपर्यंत २,८०,४३,४४६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, तर आजपर्यंत ३,७०,३८४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या १०,२६,१५९ एवढी आहे.

९० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या