24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयशेअर बाजारात मोठी घसरण

शेअर बाजारात मोठी घसरण

एकमत ऑनलाईन

मुंबई : शेअर बाजारात आज मोठी पडझड दिसून आली. बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच सेन्सेक्स ५४,००० अंकाखाली आला. तर एनएसई निर्देशांक निफ्टीदेखील १.७ टक्क्यांनी घसरला आहे. जागतिक शेअर बाजारातही घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
शेअर बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्स ५३,०७० अंकावर खुला झाला. तर, निफ्टीची सुरुवात १५,९१७ च्या पातळीवर झाली. बाजार सुरू होताच काही वेळातच सेन्सेक्समधील घसरण वाढत गेली. शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू असल्याने बाजार आणखी घसरण्याची शक्यता आहे.

१५ मिनिटांत १०००अंकांची घसरण
सकाळी ९ वाजून ३३ मिनिटांच्या सुमारास सेन्सेक्समध्ये १,०३७.५९ अंकाची घसरण होत निर्देशांक ५३,१७० अंकावर व्यवहार करत आहे. त्याशिवाय निफ्टीदेखील १६००० अंकाखाली व्यवहार करत आहे. निफ्टीमध्ये २९८.६५ अंकांची घसरण नोंदवण्यात आली.

निफ्टी ५० मधील दोन कंपन्यांचे शेअर वधारले असून इतर शेअर्स कोसळले आहेत. बँक निफ्टीतही मोठी घसरण झाली आहे. बँक निफ्टीत ७३२ अंकांनी कोसळला असून २.१४ टक्क्यांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी ३३४३१ अंकावर व्यवहार करत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या