23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयघरगुती सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ

घरगुती सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वाढत्या महागाईने होरपळणा-या जनतेला मोठा झटका बसला असून, घरगुती सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

आजपासून देशांतर्गत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानंतर राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी १०५३ रुपये मोजावे लागणार आहेत.

५ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात १८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे तर, १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ८.५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

घरगुती सिलिंडरच्या किमती वाढण्याची आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. १ तारखेला व्यावसायिक सिलिंडर १९८ रुपयांची घट करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा ९ रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या