24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयबंगळुरूत मोठा घोटाळा उघडकीस

बंगळुरूत मोठा घोटाळा उघडकीस

एकमत ऑनलाईन

बंगळुरु : बंगळुरूत या महिन्याच्या ४ तारखेला असाच एक मोठा घोटाळा उघड झाला आहे. इनकम टॅक्­स विभागाने चेन्नईच्या एका आयटी इन्­फ्रास्­ट्रक्­चर ग्रुपशी संबंधित प्रकरणात मदुराई, चेन्नईसह पाच ठिकाणी छापेमारी करीत मोठ्या घोटाळ्याचा खुलासा केल्याचा दावा केला आहे. विभागाने सांगितले की, तपासात तब्बल १००० कोटी रुपये जप्त करण्यात आले असून ज्याचा खर्च उपलब्ध नाही. हे छापे ४ नोव्हेंबर रोजी मारण्यात आले.

इनकम टॅक्­स (आईटी) विभागाने दावा केला आहे की त्यांना सिंगापूरमध्ये रजिस्टर केलेल्या कंपनीच्या संशयास्पद गुंतवणुकीशीसंबंधित महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. याशिवाय आणखी दोन कंपन्या या ग्रुपमध्ये शेअर होल्डर म्हणून आहेत. यापैकी एका ग्रुपची चौकशीची सुरुवात यापूर्वीच आयटी विभागाच्या टीमने केली आहे. दुसरी शेअर होल्डर कंपनी एक प्रसिद्ध इन्फ्रास्टक्चर डेव्हलपमेंट आणि फायडेन्शल ग्रुपची सहयोगी आहे.

चेन्नई आणि मदुराईमध्ये ५ ठिकाणी छापे
आयटी विभागाचे म्हणणे आहे की, ज्या कंपनीवर छापा मारण्यात आला त्याच्याजवळ ७२ टक्के शेअर्स आहे. तर ही गुंतवणूक कमी आहे. इतर शेअर्स दुस-या कंपनीजवळ आहे. आणि त्यांची गुंतवणूक जास्त आहे. विभागाकडून सांगण्यात आले की, या प्रकारे साधारण ७ कोटी सिंगापूर डॉलरचा फायदा करण्यात आला आहे. हे साधारण २०० कोटी भारतीय रुपयांइतके आहे. मात्र कंपनीने याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. इनकम टॅक्स विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार विभागाने ४ नोव्हेंबर रोजी चेन्नई आणि मदुराई येथील पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. आता काळा पैशाच्या कायद्यानुसार २०१५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. गुंतवणुकीचे सध्याचे मूल्य ३५४ कोटी रुपयांहून जास्त आहे.

फटाकेबंदी नाही ; पण संयम बाळगा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या