24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयबिल्किस बानो प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला नोटीस

बिल्किस बानो प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला नोटीस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सध्या देशभर चर्चेत असलेल्या बिल्किस बानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला नोटीस दिली आहे. या प्रकरणातील ११ आरोपींच्या मुक्ततेबाबत २ आठवड्यात उत्तर द्या! असे न्यायालयाने म्हटले आहे. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावली. त्याची स्वतंत्र सुनावणी आता २ आठवड्यांनी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दोषींना त्यांची बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ११ दोषींच्या सुटकेवर गुजरात सरकारकडून उत्तर मागितले आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुभाषिनी अली यांच्यासह चार जणांनी या प्रकरणातील ११ दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.
सामाजिक कार्यकर्त्या सुभाषिनी अली, रोकपी वर्मा आणि पत्रकार रेवती लाल यांनी या प्रकरणातील ११ दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. हे ११ दोषी बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या कुटुंबातील ७ सदस्यांची हत्या केल्याप्रकरणी १५ वर्ष तुरुंगात होते. परंतु गुजरात सरकारने राज्यात लागू केलेल्या सुटकेच्या धोरणानुसार, १५ ऑगस्ट रोजी दोषींची सुटका केली. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या