25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयलोकसंख्या नियंत्रणासाठी लवकरच संसदेत विधेयक

लोकसंख्या नियंत्रणासाठी लवकरच संसदेत विधेयक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वाढत्या लोकसंख्येला आवर घालत लोकसंख्येचे संतुलन राखण्यासाठी केंद्र सरकार देशपातळीवर कायदा करण्याच्या तयारीला लागली आहे. या संदर्भातले विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्याची तयारी सरकारने केली आहे. या विधेयकाचा मसुदाही जवळजवळ तयार करण्यात आला आहे. संसदीय कायदा मंत्रालयाने याला हिरवा झेंडा दाखवताच जनतेची मते घेऊन तो सार्वजनिक करण्यात येणार आहे.

देशभरातील लोकसंख्येचे असंतुलन दूर करण्यासाठी लोकसंख्या संतुलन विधेयक-२०२२ संसदेच्या पटलासमोर मांडले जाणार आहे. अनेक राज्यात गेल्या काही वर्षांत लोकसंख्येच्या असंतुलनामुळे अनेक प्रकारची आव्हाने उभी राहिली आहेत. खासकरून आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या प्रदेशांत ही समस्या वेगाने वाढत आहे.
वेगवेगळ्या सर्वेक्षणांनुसार, सीमा राज्यांत मुस्लिम लोकसंख्या गेल्या १० वर्षांत ३० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. तर सर्वसामान्य लोकसंख्या १०-१२ टक्के वाढली आहे. त्यामुळे पूर्वोत्तरमध्ये काही राज्यांत मूळ निवासींची ओळख धोक्यात आली आहे. सोबत राष्ट्रीय सुरक्षेची अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत.

म्हणून सरकारला वाटतेय गरज
लोकसंख्येती असंतुलन हे रोजगाराच्या संधी आणि सांस्कृतिक ओळखीसाठी सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. घुसखोरी, धर्मांतर आणि कोणत्याही एका ठिकाणी लोकसंख्येच्या दाट लोकवस्तीमुळे केंद्र सरकारला त्यावर कायदा करण्याची गरज वाटत आहे.देशातील बहुतांश राज्यात हे लोकसंख्येचे असंतुलन पाहायला मिळत आहे.

सरसंघचालकांनी केले होते सुतोवाच
नागपूर येथे अलिकडेच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी शिबिरात सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्येच्या असंतुलनावर बोट ठेवत हे असंतूलन दूर करण्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज व्यक्त केली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या