24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयआरएसएस चड्डी जाळण्याच्या काँग्रेसच्या पोस्टमुळे भाजप आक्रमक

आरएसएस चड्डी जाळण्याच्या काँग्रेसच्या पोस्टमुळे भाजप आक्रमक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसने ३,५७० किलोमीटरची कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरू केली आहे जी १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाईल. निवडणुकीतील यशाचे उद्दिष्ट ठेवून काँग्रेसने पुन्हा नव्याने वाटचाल सुरू केली आहे.

काँग्रेस आता फक्त राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांपुरती मर्यादित आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलचा वापर करून ट्विट केले होते, देशाला द्वेषाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आणि भाजप-आरएसएसने केलेले नुकसान पूर्ववत करण्यासाठी. टप्प्याटप्प्याने, आम्ही आमचे ध्येय गाठू. भारत जोडो यात्रा या ट्विटमध्ये आरएसएसची चड्डी जळत असल्याचे दाखवण्यात आल्याने यावरून वाद निर्माण झाला आहे.

काँग्रेसच्या ट्विटला उत्तर देताना भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी ट्विट केले आहे की काँग्रेसने १९८४ मध्ये दिल्लीला आग लावली. २००२ मध्ये गोध्रा येथे ५९ कारसेवकांना जिवंत जाळले. ही परिसंस्था आहे. त्यांनी पुन्हा त्यांच्या इकोसिस्टमला हिंसेचा कौल दिला आहे. राहुल गांधी भारतीय राज्याविरुद्ध लढत आहेत. काँग्रेस घटनात्मक मार्गांवर विश्वास ठेवणारा पक्ष नाही.

भारत तोडो यात्रा : पात्रा
भाजपच्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेसचे जयराम रमेश म्हणाले मला टी-शर्ट, अंडरवेअरबद्दल बोलायचे नाही. जर भाजपला कंटेनर, शूज आणि टि-शर्ट बद्दल मुद्दा काढायचा असेल तर ते या यात्रेला घाबरले आहेत. त्यामुळेते काहीही बोलू शकतात हे दिसून येते. झूट की फॅक्टरी सोशल मीडियावर ओव्हरटाइम चालू आहे, भाजपचे संबित पात्रा म्हणाले की ही भारत जोडो यात्रा नसून भारत तोडो आणि आग लगाओ यात्रा आहे. काँग्रेस पक्षाने असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मला राहुल गांधींना विचारायचे आहे की तुम्हाला या देशात हिंसाचार हवा आहे का?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या