लखनौ : सन २०२४ साली देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आतापासूनच कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपने ७५ जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. त्यापैकी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ७५ जागा जिंकण्याचे उद्दीष्ट भाजपने ठेवले आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या. तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या अपना दलाने दोन जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ८० पैकी ६२ जागा आणि मित्रपक्ष अपना दल (एस) ला दोन जागा मिळाल्या होत्या.