लखनौ : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला भाजपचा विरोध आहे. असा दावा भाजपचे उत्तरप्रदेशमधील खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. यामुळे त्यांना थांबविण्यासाठी काय प्रयत्न केले हे ओपनली सांगू शकत नाही, असे म्हणणारे चंद्रकांत पाटील मात्र तोंडावर पडले आहेत. तर राज ठाकरेंनी केलेल्या भाषणात त्यांचा रोख भाजपकडे असल्याचेही दिसून आले होते. आता कुठेतरी राज ठाकरेंची शंका खरी होती, अशी चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले बृजभूषण?
भाजपच्या खासदार बृजभूषण सिंह यांना स्थानिक पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, राज ठाकरेंच्या दौ-याला तुमचा विरोध आहे का? यावर बोलताना त्यांनी हे पक्षांचे काम आहे. आमच्या आंदोलनाला कोण विरोध करेल?, पक्षाच्या सांगण्यावरूनच मी राज ठाकरेंच्या दौ-याला विरोध करत आहे, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. यामुळे भाजपचे राज्यातील नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राज ठाकरेंच्या विरोधांत भाजपकडूनच ट्रॅप होता का अशी चर्चा सुरू झाली आहे.