30.8 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home राष्ट्रीय देशाला विभागण्यासाठी भाजपकडून लव्ह जिहाद शब्दाची निर्मिती

देशाला विभागण्यासाठी भाजपकडून लव्ह जिहाद शब्दाची निर्मिती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भाजपशासित राज्यात सध्या ‘लव्हजिहाद’ विरोधात कायदा करण्याची मोहिम राबवली जात आहे. त्यावरुन राजस्थानचे काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘लव्ह जिहाद’ या शब्दाची निर्मिती भाजपकडून देशाला विभागण्यासाठीच करण्यात आली आहे. सांप्रदायिक सद्भावनेला हानी पोहचवण्याचा भाजपचा हेतू असल्याचा आरोप अशोक गेहलोत यांनी केला.

‘प्रेमात जिहादला जागा नाही’
सोशल मीडियावरून भाजपवर टीका करताना गेहलोत यांनी तीन ट्विट केले आहेत. ‘देशाला विभागण्यासाठी आणि सांप्रदायिक सौहार्द बिघडवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ या शब्दाची निर्मिती भाजपद्वारे करण्यात आली आहे. असा कायदा आणणे हे असंवैधानिक आहे. प्रेमात जिहादला कोणतीही जागा नाही’, असेही गेहलोत यांनी म्हटले आहे. सहमतीने एकत्र येणाºया सज्ञान व्यक्तींनाही सत्तेच्या दयेची याचना करावी लागेल, अशाप्रकारचे वातावरण देशात बनविण्याचा भाजपाचा डाव आहे. विवाह हा सर्वस्वी खासगी निर्णय आहे आणि हे त्यावरच अंकुश लावू इच्छितात, अशीही टीका त्यांनी केली.

‘लव्ह जिहाद’विरुद्ध योगींचा कायदा
मध्य प्रदेशानंतर उत्तर प्रदेशातही लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. इतकेच नाही तर मध्य प्रदेश सरकारहून एक पाऊल पुढे टाकत योगी सरकारच्या गृह मंत्रालयाकडून कायदा तयार करण्यासाठी एक प्रस्ताव कायदे आणि विधी विभागाकडे पाठवण्यात आला आहे. ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे. यापूर्वी मध्य प्रदेशच्या शिवराजसिंह चौहान सरकारनेही लव्ह जिहादविरोधात ‘धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२०’आणण्याचे सूतोवाच केले होते. यानुसार, जबरदस्तीने धर्मांतरणाच्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद असू शकते.

रेतीने भरलेली दोन ट्रक तहसीलदारांनी पकडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या