20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeराष्ट्रीयभाजपला गळती, आमदार सोळंकी आपमध्ये प्रवेश

भाजपला गळती, आमदार सोळंकी आपमध्ये प्रवेश

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : गुजरातमध्ये आता विधानसभेचं तिकीट न मिळाल्याने नाराज नेत्यांच्या पक्षांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील मातर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार केसरीसिंह सोळंकी यांनी भाजपने तिकीट नाकारल्यानंतर गुरुवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला.

आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी ओबीसी नेते केसरीसिंग सोळंकी यांचे पक्षात स्वागत केले. एक ट्विट करून इटालिया यांनी ही घोषणा केली. आपने मात्र महिपतसिंग चौहान यांना मातर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. केसरीसिंह सोळंकी हे गुजरातमधील मातरचे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी दोन वेळा भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सोळंकी यांनी २०१७ ची विधानसभा निवडणूक मातरमधून भाजपकडून लढवली होती.

सोळंकी यांनी २०१७ मध्ये काँग्रेसचे उमेदवार संजय पटेल यांचा २,४०६ मतांच्या फरकाने विजय मिळावला होता. सिंग हे अनेकदा त्यांच्या कामांवरून वादात राहतात. २०२१ मध्ये पोलिसांनी सोळंकी यांना पावागढमध्ये दारू पार्टी आणि जुगार खेळताना पकडले होते. या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षाही सुनावली होती. तसेच चार हजारांचा दंडही ठोठावण्यात आला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या