23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयभाजप वोट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही

भाजप वोट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही

एकमत ऑनलाईन

मिर्झापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवार दि़ १ ऑगस्ट रोजी एक दिवसीय उत्तर प्रदेश दौ-यावर होते. मिर्झापूर येथे बोलताना ते म्हणाले, यापूर्वी वोट बँकेच्या राजकारणामुळे अनेक कामे झाली नाहीत. मात्र, भाजप वोट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही. ब-याच दिवसांनंतर उत्तर प्रदेशात आलो आहे. पण जेव्हा केव्हा येतो, तेव्हा घरी आल्यासारखे वाटते. याच उत्तर प्रदेशने २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये संपूर्ण बहुमताचे सरकार दिले आहे.

उत्तर प्रदेशची अपेक्षा आणि आवश्यकता काय आहेत, हे मोदीजींना पूर्णपणे माहीत आहे. ५५० वर्षांपासून रखडून पडलेल्या राम मंदिराची सुरुवात मोदीजींनी केली. भाजप सरकारने प्रत्येक परंपरा जिवंत केली आहे. आपल्या आस्थेचा सन्मान का होत नाही, असा प्रश्न लोक करत होते. विरोधकांवर हल्ला चढवताना शाह म्हणाले, माझा प्रश्न आहे, राम मंदिर का बांधण्यात आले नाही? विंध्यवासिनीचे काम का झाले नाही?

योगी सरकारचे केले कौतुक
योगी सरकारचे कौतुक करताना ते म्हणाले, योगी सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत. त्या आधी नव्हत्या. उत्तर प्रदेशात नेहमीच दंगली व्हायच्या, मात्र, आता दंगली होत नाहीत. योगींनी राज्यात कायद्याचे राज्य कायम केले.

जुलैमध्ये सहा लाख कोटी रुपयांचे विक्रमी व्यवहार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या