23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयभाजप-जदयूूच्या भांडणाचा फटका बिहारला बसला

भाजप-जदयूूच्या भांडणाचा फटका बिहारला बसला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांवरून राजकीय हल्ले सुरू आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी रविवारी भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेडवर निशाणा साधला.

राज्य जळत आहे आणि दोघेही आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका बिहारला बसला आहे. प्रशांत किशोर यांनी ट्विटद्वारे हिंसाचाराचे समर्थन केले आहे. त्यांनी लिहिले, अग्निपथवर आंदोलन व्हायला हवे, हिंसाचार आणि तोडफोड नाही. जदयू आणि भाजपमधील आपसी भांडणाचा फटका बिहारमधील जनतेला सहन करावा लागत आहे.

बिहार जळत आहे आणि दोन्ही पक्षांचे नेते प्रकरण मिटवण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. अनेक संघटनांनी शनिवारी बिहार बंदची घोषणा केली होती. या काळात राज्यात हिंसाचार झाला होता. पोलिसांनी आतापर्यंत राज्यात ७०० हून अधिक जणांना अटक केल्याचे वृत्त आहे. त्याच वेळी घटनांबाबत १३८ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. राज्यातील तारेगणासह अनेक रेल्वे स्थानकांवर आंदोलकांनी गोंधळ घातला. या काळात रेल्वेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या