28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीय२०२४ साठी भाजपची जम्बो बैठक; पराभूत १४४ जागा जिंकण्याचा केला निर्धार

२०२४ साठी भाजपची जम्बो बैठक; पराभूत १४४ जागा जिंकण्याचा केला निर्धार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची आज मोठी बैठक होत आहे. भाजपच्या दिल्ली मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत १४४ लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी रणनीती तयार केली जाईल. ज्या भाजपने गेल्या निवडणुकीत थोड्या फरकाने गमावल्या होत्या. यामध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या किंवा कधीतरी जिंकलेल्या मतदारसंघांचाही समावेश आहे. या जागा गटांमध्ये विभागल्या गेल्या असून प्रत्येक गटाचे नेतृत्व एका केंद्रीय मंत्र्याच्या हाती देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितले. मंत्र्यांनी या मतदारसंघातील भाजपच्या स्थितीचे विश्लेषण केले असून आणि २०२४ च्या निवडणुकीत पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी याबाबत रणनीती बनवली आहे. आजच्या बैठकीत मंत्री या मतदारसंघांचा सविस्तर अहवाल सादर करतील.

या बैठकीला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित
भाजपच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटन महासचिव बीएल संतोष, सुनील बन्सल, भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, सुभाष सरकार, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी एल मुर्गन, पंकज चौधरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी, केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश, केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर, केंद्रीय मंत्री संजीव बल्यान, केंद्रीय मंत्री बीएल वर्मा अर्जुन मुंडा आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या