24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयमोहम्मद पैगंबर अवमान प्रकरणी भाजप नेत्याला अटक

मोहम्मद पैगंबर अवमान प्रकरणी भाजप नेत्याला अटक

एकमत ऑनलाईन

कानपूर : मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे जगभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. आखाती देशांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच आता कानपूरमध्ये भाजपच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे.

फेसबुक आणि ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कर्नलगंज पोलिसांनी भाजप नेत्याला अटक केली आहे. हर्षिल श्रीवास्तव असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षिल श्रीवास्तव हा भाजपच्या फ्रंटल संघटनेच्या युवा मोर्चाचा मंत्री असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचाही तो सदस्य आहे. त्याने आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून विशेष धर्माविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम १५३ ए (धर्म किंवा जातीच्या नावावर द्वेष पसरवणे), कलम २९५ ए (धार्मिक भावना भडकावणे), आयटी अ‍ॅक्ट कलम ५०७ आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त विजय सिंह मिणा यांनी दिली आहे. तसेच अशा प्रकारच्या पोस्ट करून शहरातील वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या