25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयभाजप नेत्याने पत्नीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या

भाजप नेत्याने पत्नीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या

एकमत ऑनलाईन

मुंगेर (बिहार) : भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केली. नंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता.१६) बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अरुण यादव (वय ४०) व प्रीती यादव (वय ३५) असे मृत पती-पत्नीचे नावे आहेत. अरुण यादव हे भाजपच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नेते होते.

त्यांची पत्नी यंदा महापौर निवडणुकीसाठी प्रचार करत होत्या. घटनेनंतर दाम्पत्याचे मृतदेह पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळावरुन एक पिस्तूल आणि एका कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या घटने मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या