30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयभाजपनेत्याकडून रेमेडिसीवरचा साठा निषेधार्ह - प्रियांका गांधी

भाजपनेत्याकडून रेमेडिसीवरचा साठा निषेधार्ह – प्रियांका गांधी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राज्यात रेमेडिसीवरुन सध्या सत्ताधारी व विरोधी पक्षांत राजकारण सुरु आहे. आता या राजकारणात काँग्रेस पक्षाच्या सरचिटणिस प्रियांका गांधी यांनीही उडी घेतली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी रेमडेसेवीरचा साठा करणे हे मानवतेविरुद्ध आहे, असे टीकास्त्र प्रियांका गांधी यांनी सोडले आहे.

जेव्हा देशाच्या कानाकोप-यातून रेमडेसिवीरची मागणी होत आहे. जीव वाचविण्यासाठी रेमडेसिवीर मिळावे, म्हणून लोक प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. अशा वेळी, एका महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या भाजपच्या नेत्याने रेमडेसिवीरची साठेबाजी करणे, मानवतेविरुद्ध आहे, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. आपल्या या ट्विट सोबत प्रियांका गांधी यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस ठाण्यातील पोलिसांना धारेवर धरतानाचा एक व्हिडीओ जोडला आहे. दरम्यान राज्यातील भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे

कोरोना बाधित आढळल्यास थेट कोव्हिड केअर सेंटरला रवानगी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या