35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय जम्मू काश्मीरमधील बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांकडून भाजपा नेत्याची हत्या

जम्मू काश्मीरमधील बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांकडून भाजपा नेत्याची हत्या

एकमत ऑनलाईन

जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भाजप नेते शेख वसीम, त्यांचे वडील आणि त्यांचा भाऊ यांना गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली. बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भाजपा कार्यकर्ता वसीम बारी यांच्यावर गोळीबार केला. अंदाधुंद केलेल्या गोळीबारात वसीम बारी, त्यांचे वडील बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्या ठिकाणी तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली.

शेख वसीम हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष होते आणि आपल्या कुटुंबीयांसोबत एका दुकानाजवळ बसले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी त्यांच्यानजीक कोणीही नव्हतं. तसंच सुरक्षा रक्षकही उपस्थित नव्हता. वसीम यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. परंतु घटनेदरम्यान त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हतं.

त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्या ठिकाणी तिघांचाही मृत्यू झाला. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हे भ्याड कृत्यू असून दहशतवाद संपेपर्यंत ही लढाई सुरूच राहिल असं मत त्यांनी व्यक्त केलं.

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे भाजपा नेते शेख वसीम, त्यांचे वडील व भाऊ यांच्या हत्येचा आम्ही तीव्र निषेध करतो. हे भ्याडपणाचं कृत्य आहे. दहशतवाद संपेपर्यंत हा लढा सुरूच राहिल, असं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला.

Read More  करोना विषाणू मारणारे फिल्टर तयार; संशोधकांचा दावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या