21.9 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeराष्ट्रीयकर्नाटकात भाजप नेत्याची हत्या ; दक्षिण कन्नड जिल्ह्यात कलम १४४ लागू

कर्नाटकात भाजप नेत्याची हत्या ; दक्षिण कन्नड जिल्ह्यात कलम १४४ लागू

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : कर्नाटक सरकारचा आज एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, पण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज वर्षपूर्तीनिमित्त होणारा कार्यक्रम रद्द केला आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा केली आहे. भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याने भाजपने हा निर्णय घेतला आहे.

भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेट्टारू याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आज कर्नाटकातील बोम्मई सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान, दोड्डबल्लापूरमध्ये विधानसभेचा अधिकृत कार्यक्रम आणि मेगा रॅली ‘जनोत्सव’ होणार होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही या रॅलीत सहभागी होणार होते.

मात्र, येथे तणाव वाढू नये म्हणून दक्षिण कन्नड जिल्हा पोलिस हद्दीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये आपल्याच सरकारविरोधात नाराजी आहे. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर राजीनामे देत आहेत. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार यांना घेरले. यासोबतच काँग्रेसचे आमदार प्रियांक खर्गे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

तत्पूर्वी, बुधवारी मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाला न्याय दिला जाईल आणि हे घृणास्पद कृत्य करणा-यांना सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. मारेक-­यांना पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आली असून ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. दोषींना लवकरच पकडले जाईल आणि कठोर शिक्षा करण्यात येईल.

नेमके काय आहे प्रकरण?
प्रवीण नेट्टारू या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याचे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे भागात पोल्ट्रीचे दुकान होते. गेल्या मंगळवारी प्रवीण दुकान बंद करून घरी परतत असताना काही दुचाकीस्वारांनी त्याचा मार्ग अडवून प्रवीणवर कु-हाडीने वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हत्येनंतर कर्नाटकात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या