26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयभाजप नेते मित्र पक्षांशी बोलणार

भाजप नेते मित्र पक्षांशी बोलणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जुलै महिन्यात होणा-या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजप एनडीएमधील मित्रपक्षांसोबत चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. त्याशिवाय यूपीएच्या मित्रापक्षांसोबत आणि अपक्षांसोबतही भाजप चर्चा करणार आहे.

या चर्चेची जबाबदारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यावर सोपवली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ तारखेला मतमोजणी होणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल.

१८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करायचे असल्यास लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य त्यात सहभागी होतील आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होईल. त्यानंतर भारताच्या नवीन राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाईल. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

छोट्या-मोठ्या पक्षांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी चुरस सुरू झाली आहे. रविवारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मोठी जबाबदारी दिली आहे. एनडीएचे मित्रपक्ष, अपक्ष आणि यूपीएच्या मित्रपक्षांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर सोपवली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या