28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयभाजप आमदाराचे महिलेशी गैरवर्तन

भाजप आमदाराचे महिलेशी गैरवर्तन

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : कर्नाटकातील भाजपचे आमदार अरविंद लिंबावली यांनी एका महिलेला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बंगळुरुच्या वर्थुरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या समस्यांची लेखी तक्रार करण्यास गेलेल्या या महिलेसोबत भाजप आमदाराने गैरवर्तन केले आहे.

लिंबावली यांनी तुरुंगात डांबण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. ही महिला काँग्रेस कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भाजप आमदार लिंबावली हे महिलेला शिवीगाळ करत तिच्याकडील कागद फाडताना दिसत आहेत. त्या महिलेच्या हातात एक कागद होता आणि तो आमदाराला दाखवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, आमदारानं तो हिसकावून फाडला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या