22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयमतदानासाठी आलेला भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह; पत्नीलाही कोरोनाची लागण

मतदानासाठी आलेला भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह; पत्नीलाही कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

मध्य प्रदेश : राज्यसभा निवडणूकीत मध्य प्रदेशमध्ये मतदानासाठी आलेला भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. देशभरात काल राज्यसभेच्या 19 जागांवर काल मतदान घेण्यात आले. मध्य प्रदेशमध्येही राज्यसभेच्या तीन जागांवर मतदान झाले. या जागांवर भाजपाचे दोन आणि काँग्रेसचे एक उमेदवार जिंकले. भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह सोलंकी हे राज्यसभेवर जाणार आहेत. तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह हे राज्यसभेवर गेले आहेत.

दरम्यान या मतदानासाठी पटनामध्ये आलेले भाजपाचे जावद मतदारसंघाचे आमदार ओमप्रकाश सकलेचा हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे.

सकलेचा यांनी सांगितले की, गुरुवारी त्यांच्या पत्नीला ताप आला होता. यामुळे त्यांनी दोघांचीही चाचणी भोपाळच्या एका खासगी लॅबमध्ये केली होती. या चाचणीचा रिपोर्ट शुक्रवारी रात्रीच पॉझिटिव्ह आला आहे. याच दिवशी राज्यसभेचे मतदान झाले. जावद विधानसभा मतदारसंघ नीमच जिल्ह्यात येतो. सकलेचा हे 16 जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी भोपाळमध्ये आले होते.

Read more  नाराजी दूर : राजू शेट्टी विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या