22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयभाजप बंगालमध्ये २०० जागा जिंकणार - अमित शहा यांचा दावा

भाजप बंगालमध्ये २०० जागा जिंकणार – अमित शहा यांचा दावा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीला पश्­चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत २०० हून अधिक जागा मिळतील असा दावा केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शाह यांनी केला आहे. सोनार बांगलाचे भाजपचे स्वप्न आता साकार होणार आहे. असा दावाही त्यांनी केला.एका वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अमित शाह यांना पश्­चिम बंगालमध्ये भाजपच्या किती जागा येतील याबाबत प्रश्न विचारला. लोकसभेलाही भाजपला पश्­िचम बंगालमध्ये काही जागांवर थोड्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. आता पुन्हा एकदा भाजपने कंबर कसली आहे. विधानसभेसाठी पश्­चिम बंगालमध्ये भाजपचं कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोर लावला आहे.

पश्­चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये सतत्याने खटके उडत असतात. आतापर्यंत कम्युनिस्ट आणि तृणमूलने पश्­िचम बंगाल हातातून जाऊ दिले नाही. त्यामुळे आता भाजपला तिथे यश मिळवता येणार का? भाजपला आजपर्यंत पश्­िचम बंगालमध्ये कमळ फुलवण्यात यश आले नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपचे प्रयत्न सुरू असतानाच अमित शाहांनी जे भाकीत वर्तवले ते सत्यात उतरणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे.

पश्चिम बंगालमध्ये साधारण एप्रिलदरम्यान विधानसभा निवडणूक लागण्याची शक्­यता आहे. या निवडणुकीच्या तारख्या येत्या आठवड्यात जाहीर होतील, अशी शक्­यता व्यक्त केली जात आहे. तर प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता कधीही काबीज न करता आलेला पश्चिम बंगालचा गड जिंकण्यात भाजपला यश येणार का हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

केरळमध्ये मोठ्या प्रमाणात लव्ह जिहाद – ई श्रीधरन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या