18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयदेशात ७ पैकी ४ जागांवर भाजप विजयी

देशात ७ पैकी ४ जागांवर भाजप विजयी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील ६ राज्यांतील ७ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, त्यात ४ जागांवर भाजपचा डंका वाजला आहे. उत्तर प्रदेशाच्या गोला गोकर्णनाथ, बिहारच्या गोपालगंज, ओडिशाच्या धामनगर व हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघात भाजपचा विजय झाला.

बिहारच्या मोकामात राजद उमेदवार तथा बाहुबली अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांचा विजय झाला, तर तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समिती व महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय झाला. बिहारमध्ये राजदचे नेते अनंत सिंह हे दोषी ठरल्याने त्यांचे सदस्यपद रद्द झाले होते. त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी नीलम देवी विजयी झाल्या आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या बालेकिल्ल्यातील गोपालगंज मतदारसंघात भाजपने आपली जागा राखली. येथे भाजपच्या कुसुम देवी विजयी झाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या