26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयमुस्लिम मतांवर भाजपाचा डोळा, १८५ नेत्यांना देणार प्रशिक्षण

मुस्लिम मतांवर भाजपाचा डोळा, १८५ नेत्यांना देणार प्रशिक्षण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला जे कधीही मते देत नाहीत असे मानले जाणा-या मुस्लिम वर्गाला तुष्टीकरण नव्हे तर तृप्तीकरण या मार्गाने आपल्याकडे वळवून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हैदराबाद संदेशा’ ची अंमलबजावणी भाजपने लगेचच सुरू केली आहे.

विशेषत: ७५ वर्षांनंतरही जो मोठा वर्ग आजही गरीबीत जगत आहे अशा ‘पसमांदा’ मुस्लिमांच्या मतपरिवर्तनासाठी भाजपने आपल्या अल्पसंख्यांक नेत्यांच्या प्रशिक्षणाचा जंगी कार्यक्रम आखला आहे. हरियाणात येत्या २५ जुलैपासून देशभरातील किमान १८५ अल्पसंख्यांक भाजप नेत्यांचा हा प्रशिक्षण वर्ग होणार आहे.

भाजपने मध्य व बहुतांश उत्तर भारतात आपला जम बसविला असून तेथे हिंदू समाजातून भाजपला यापेक्षा जास्त जनाधार मिळण्याची अपेक्षा नाही. त्यामुळे तेलंगणाच्या मार्गे दक्षिण दिग्विजय मोहीमेवर उतरण्याची योजना भाजप नेतृत्वाने अंमलात आणण्यास सुरवात केली आहे. मात्र देशाच्या अन्य भागांतही मुसलमान समाज भाजपपासून आजही दूर आहे.

२०१४ नंतर पक्ष म्हणून भाजपचे बदललेले स्वरूप, ध्येयधोरणे, पक्षाचे मुख्यमंत्री-नेत्यांची वेळोवेळी येणारी वादग्रस्त वक्तव्ये यामुळे मुसलमान समाजात सध्याच्या भाजपबद्दल भितीची व असुरक्षिततेचीच भावना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणात ‘अल्पसंख्यांकांना जिंका‘ मोहीमेची सुरवात केली व त्यासाठी देशभरात ‘स्रेहयात्रा‘ काढण्याचा आदेश पक्षनेत्यांना दिला. त्यानुसार हरियाणातील आगामी प्रशिक्षण वर्गाची संकल्पना आखण्यात आली आहे. मुस्लिम समाजातील ८० टक्के वर्ग आजही गरीबीत रहातो.

या पसमांदा मुसलमान वर्गाला निवडणुका व मते या पलीकडे जाऊन आपलेसे वाटणारे उपाय राजकीय पक्षांकडून व्हायला हवेत. भाजपने त्यासाठी जो प्रशिक्षमाचा उपक्रम राबविण्याचा निर्मय घेतला तो गंभीरपणे अंमलात आला तर पक्षाला २०२४ च नव्हे तर राज्यांच्या निवडणुकांतही त्याचा मोठा फायदा मिळू शकतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या