36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयभाजपच्या ४० लोकसभेच्या जागा संकटात

भाजपच्या ४० लोकसभेच्या जागा संकटात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषि कायद्यांवरुन पंजाब व हरयाणातील शेतकरी संघटनांनी केंद्रसरकारविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून आंदोलन पुकारले आहे. दिवसेंदिवस त्याची धग वाढत असून आपल्याला विशेष फटका बसणार नाही, अशा भ्रमात असलेल्या भाजपची चिंता वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या रोषाचा फटका भाजपला पंजाब,हरयाणा व उत्तरप्रदेशमधील मिळून तब्बल ४० जागांवर बसु शकतो, असा अंदाज खुद्द भाजपच्याच नेत्यांनी पक्षनेतृत्वाकडे व्यक्त केला आहे.

शेतकरी संघ शेतकरी संघटनांचे आंदोलन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. आंदोलन लवकर न संपण्याची लक्षणे दिसू लागताच भाजप नेतृत्वाने पंजाब, हरयाणा व पश्चिम उत्तरप्रदेशमधील स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन त्याच्या पडसादाची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला.

शेतकरी आंदोलन जाट पट्टयात पसरु लागल्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. साखर पट्टयात आंदोलक शेतक-यांच्या महापंचायती होत असताना, पक्ष प्रमुख जे.पी.नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आमदार, खासदार आणि जिल्हास्तरीय नेत्यांबरोबर चर्चा केली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय कृषि राज्यमंत्री संजीव बलियान सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. तोमर आणि बलियान दोघे जाट समाजातून येतात. यावेळी जिल्हस्तरीय नेते व आमदार, खासदारांनी चिंता व्यक्त केली. जाट समाजाच्या नाराजीचा या भागातील लोकसभेच्या ४० जागांवर परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केल्याचे समजते.

कायद्यांची जागृती वाढवण्याचा आदेश
नेत्यांची चर्चा ऐकल्यानंतर पक्षनेतृत्वाने कृषि कायदे मागे घेण्याविषयी सुतरामही भाष्य केले नाही. उलट या कायद्यांमुळे शेतक-यांना होणारे फायदे सांगण्याची मोहिम आणखी तीव्र करा. जेणेकरुन दिशाभूल करणा-यांना लोकांकडूनच उत्तर मिळेल अशी सूचना शाह यांनी बैठकीत पक्ष नेत्यांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. जाट प्राबल्य असलेल्या भागात हे आंदोलन आणखी पसरणार नाही, याची भाजपाला काळजी घ्यावी, अशी सूचनाही दिली. त्यासाठी स्थानिक नेत्यांना खाप नेत्यांच्या संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच यावरुन उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणामधील भाजपा पदाधिका-यांना रणनिती बनवण्याची सूचना केली आहे.

भारताचा ऐतिहासिक विजय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या