24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयभाजपचे चोर दरवाजाने निवडणुका जिंकण्याचे लक्ष्य

भाजपचे चोर दरवाजाने निवडणुका जिंकण्याचे लक्ष्य

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये परप्रांतिय नागरिकही मतदान करू शकणार आहे. या सर्वामध्ये आता राजकीय वातावरण तापू लागले असून, भाजपला जम्मू-काश्मीरची निवडणूक चोर दरवाजातून जिंकायची आहे. अशा प्रकारे संपूर्ण देशात लोकशाही धोक्यात आली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी पक्ष ईव्हीएम आणि पैशाचा वापर करत असल्याचा जोरदार हल्लाबोल पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर केला आहे.

मुफ्ती म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही नष्ट होत असून जम्मू-काश्मीर ही भाजपची प्रयोगशाळा झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी २५ लाख बा मतदारांचा समावेश करण्यात आला असून भाजपला इस्रायल आणि फॅसिस्ट जर्मनीचे धोरण काश्मीरमध्ये आणायचे आहे. भाजप संविधान नष्ट करत आहे. भाजप पैसा आणि ईडीच्या जोरावर सरकार बनवते.

आयोगाच्या घोषणेनंतर कोण करू शकणार मतदान
निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राहणारे कर्मचारी, विद्यार्थी, मजूरकिंवा देशातील इतर राज्यांतील व्यक्ती त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवू शकणार आहेत. तसेच ते जम्मू-काश्मीरमध्ये होणा-या निवडणुकीत मतदानही करू शकणार आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले इतर राज्यांतील सशस्त्र दलाचे कर्मचारीही मतदार यादीत आपली नावे समाविष्ट करू शकणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या