25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयदेशभरात भाजपचे ‘हर घर तिरंगा’

देशभरात भाजपचे ‘हर घर तिरंगा’

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : देशातील २०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत भाजपने ‘हर घर तिरंगा’सह विविध कार्यक्रमांची घोषणा हैदराबादमध्ये केली. लोकांना एकजूट करणे आणि सरकारी योजना लाभार्थींपर्यंत पोचविणे हे उद्दिष्ट यामागे आहे.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेद्वारे किमान २० कोटी घरांपर्यंत पोहचण्याचे पक्षाचे ध्येय आहे. हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीआधी पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पदाधिका-यांची बैठक झाली.
त्याची माहिती भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा वसुंधराराजे शिंदे यांनी दिली.

देश एकजूट करणे व ‘हर घर तिरंगा’ मोहीम यशस्वी करण्यासाठी व्यापक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत दोन ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक राजकीय तर दुसरा आर्थिक व गरिबांच्या कल्याणाबाबत आहे, असे त्या म्हणाल्या. तेलंगणमधील राजकीय स्थितीबाबत पक्ष एक निवेदनही प्रसिद्ध करणार आहे.

बूथ कार्यकर्ते हे भाजपचे आधारस्तंभ आहेत, असे सांगून वसुंधराराजे म्हणाल्या प्रत्येक मतदान केंद्रावर २०० कार्यकर्ते नियुक्त करण्याचे पक्षाने ठरविले आहे. पक्षाच्या संघटनात्मक आणि अन्य कार्याचा साप्ताहिक आढावा बूथनिहाय घेतला जाणार आहे. सरकारी योजनांच्या माध्यमांतून ३० कोटी लाभार्थींपर्यंत पोहचण्याचे पक्षाचे लक्ष््य आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या