25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयभाजपचे २०२४ साठी ‘मिशन १४४’

भाजपचे २०२४ साठी ‘मिशन १४४’

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आगामी १८ व्या लोकसभेसाठी मिशन २०२४ च्या तयारीला सत्ताधारी पक्ष भाजप लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याच्या जोडीलाच विजयासाठी संघटनात्मक बांधणीकडेही लक्ष देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. पक्षाने देशभरातील अशा १४४ जागांवर जोर लावण्याचे ठरविले आहे जेथे भाजप उमेदवार दुस-या वा तिस-या क्रमांकावर राहिले होते. या मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना वाटून दिली असून महाराष्ट्रातील मतदारसंघांची जबाबदारी ज्योतिरादित्य श्ािंदे, अनुराग ठाकूर, भूपेंंद्र यादव यांच्यावर सोपवली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्यासह आमदार, स्थानिक भाजप कार्यकर्ते व संघ प्रचारकांशी समन्वय साधून या नेत्यांनी या मतदारसंघांत भाजपचा खुंटा बळकट करायचा आहे.

‘मिशन १४४‘ मध्ये या सा-या जागांची विभागणी ४० उपविभागांत केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी या मतदारसंघांत वारंवार दौरे करायचे आहेत. यात सर्वाधिक १९ व १५ जागा अनुक्रमे पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशातून येतात. राज्यातील शिवसेना खासदारांच्या मतदारसंघांवरही विशेष फोकस ठेवण्याचे भाजपचे नियोजन आहे, कारण सेनेचे खासदार २०१९ मध्येही मोदींच्याच नावावर लोकसभेत पोहोचल्याचा पक्षाचा दावा आहे. ओडिशातील १३ व तेलंगणातील १२ मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघाची जबाबदारी कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्यावर तर मुलायमसिंह यादव यांच्या मतदारसंघाची जबाबदारी पीएमओचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यार टाकली आहे. या १४४ जागांवर संबंधित मंत्र्यांनी प्रत्येकी किमान ३ दिवस मुक्काम करावा व मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार प्रसारही करावा, अशाही सूचना दिल्या आहेत.

तेथील कमकुवत बूथ व विधानसभा मतदारसंघांचाही आढावा त्यांनी घ्यायचा आहे. देशभरातील ७४ हजार असे बूथ भाजपने हुडकून काढले आहेत जेथे पक्षाचे संघटन अत्यंत कमकुवत आहे. या बूथची जबाबदारी त्या त्या भागातील खासदार, आमदार, नगरसेवक व बूथप्रमुख यांच्यावर दिली आहे, असे पक्षातील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या